भारताचा पहिला टॅटू आर्टिस्ट ज्याने बनवला डोळ्यात टॅटू
सभ्य संस्कृती पासून ते या घटकेपर्यंत माणसाला टॅटूने भुरळ पाडली आहे. मोठमोठया तार- तारकांपासून ते सामन्यांन पर्यंत टॅटूचे गोंदण केल्याचे आपल्याला दिसते. टॅटू प्रेमी या पासून होणाऱ्या संभाव्य आजारांची तमा न बाळगता नवं नवे विक्रम गोंदवत आहेत.
दिल्लीतील एका टॅटू आर्टिस्टने आपल्या डोळ्यात टॅटू काढून घेतला आहे. डोळ्याच्या आतील पांढऱ्या भागात टॅटू काढून घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. मूळचा दिल्लीचा असणारा करण किंग यानी हा टॅटू बनवला आहे. डोळ्याच्या आतील भागात टॅटू करुन घेण्याची इच्छा त्याला फार दिवसांपासून होती. 'स्किरा टॅटू' त्याचे घातक दुष्परिणाम त्याला माहित आहेत. यामुळे दृष्टी जाण्याचा धोका आहे हे देखील त्याला ज्ञात आहे. पण त्याला याची पर्वा नाही. या विषयीची सगळी माहिती त्याने घेतली आहे. कॅनडामधील २४ वर्षीय कॅट गलिंगर या मॉडेलने 'स्किरा' टॅटू बनवला होता. पण काही दिवसांतच तिला आपली दृष्टी गमवावी लागली. हा संभाव्य धोका असताना सुद्धा करण किंग याने डोळ्याच्या पांढऱ्या पटलावर टॅटू काढला आहे. हे सारं जरी डोळ्यात पाणी आणणारं असलं तरी टॅटू आणि फॅशनच्या जगतातील हा नवा ट्रेण्ड असू शकतो.